दैनिक बातम्या

गुरुवार, २९ मे, २०१४ / ज्येष्ठ शु. १, शके १९३६
  • 3 डिजीटल फळ्यावर शैक्षणिक ज्ञान घेताना विद्यार्थी
  • 3 मराठी साहित्यिकांच्या टोपणनावाचे डिजीटल फळ्यावर अद्ययन करताना शाळेतील विद्यर्थी
  • 3 डिजिटल शाळेची डिजिटल फळ्याद्वारे माहिती देताना संदिप गुंड सर
  • 3 शैक्षणिक अभ्यास डिजीटलाईज्ड
  • 3 डिजीटल फळ्यावर चित्रपटाचा आस्वाद घेताना पष्टेपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी
 चला आपली शाळा बदलुया !
शाळेची माहीती देणारा व्हिडीओ
प्रतिक्रिया  
शिक्षण क्षेत्रात आज कालानुरूप विविध संकल्पना येत आहेत. दर्जेदार शिक्षणासाठी तांत्रिक साधनांचा अध्यपन अध्यापनात प्रभावी वापर होऊ लागला आहे. यातूनच ई-शाळा स्मार्ट स्कूल यासारख्या संकल्पना उदयाला आल्या आहेत. आज खाजगी शाळा, इंटरनॅशनल स्कूल, सी.बी.एस.ई शाळाच्या प्रगतीचे वैशिष्ट्य माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हेच आहे. परंतू आपल्या सरकारी शाळांमधील आजची परिस्थिती वेगळी आहे. मागील काही वर्षांत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. यामागील कारण आहे, शैक्षणिक साधनसामुग्रीचा अभाव, तोच खडू, तोच फळा, तीच छापील पुस्तकं व त्यातून मिळणारं चाकोरीबद्ध शिक्षण. परिणामी शासनाने आज शाळाच्या संख्यात्मक वाढीपेक्षा दर्जात्मक व गुणात्मक वाढीचा आग्रह धरला आहे. हे खरे आजच्या प्राथमिक शिक्षणाचे आव्हान आहे. त्यासाठी तंत्रज्ञान हा एकमेव मुलाधार आहे. हल्ली आनंददायी शिक्षण असा शब्दप्रयोग अनेकदा केला जातो कारण विद्यार्थ्याचा आनंदा हा त्याच्या शैक्षणिक प्रगतीचा मुळ गाभा आहे. कोठे आहे आजच्या विद्यार्थ्याचा आनंद? तो आहे मोबाईल, टी.व्ही संगणकाच्या रंगीत दुनियेत. विद्यार्थ्यांना हवे आहे ते मुळातच तयार आहे. आपल्याला फक्त त्याला लागणार्‍या तांत्रिक साधनांची तरतूद करायची आहे. या विचारप्रवाहातूनच जि.प. शाळा पष्टेपाडा ता. शहापूर, जि. ठाणे या शाळेने प्रोजेक्ट शिक्षा -शिक्षणासाठी तंत्रज्ञान हा अभिनव उपक्रम हाती घेऊन लोकसहभागातून साकार केली एक नाविन्यपूर्ण संकल्पना माझी डिजीटल शाळा. हा प्रोजेक्ट फक्त नाविन्यता नसून तोच फळा व त्याच खडूला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक रंजक कल्पना आहे. अनेक शाळांनी या प्रोजेक्टमधून प्रेरणा घेऊन डिजीटलायझेशनकडे पावलं उचलली आहेत. ज्यामुळे हा प्रोजेक्ट एक डिजीटल शैक्षणिक चळवळ झाला आहे. या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे शिकणे व शिकवणे हे नित्याचे काम न होता एक सर्वांगसुंदर अनुभव झाला आहे. तंत्रज्ञानातून शिकणे व शिकवण्यासारखे खूप काही आहे. त्यासाठी गरज आहे ती पारंपारिक शिक्षणपद्धतिचा पांगूळपाडा सोडून विज्ञानाच्या घोड्यावर बसण्याची. चला तर मग आपल्या हिमतीवर आपल्या शाळा बदलूया. जे एका पाड्यावरील शाळेत घडू शकते ते आपल्या शाळेत का नाही घडू शकणार?
खडू फळा विरहीत रंजक अध्यापनामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणातील आनंद वाढत आहे.
- जाधव सर, टहापूर.



आधुनिक तांत्रिक साधनांच्या उत्कृष्ट वापराने मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीला वेग आला आहे.
- लोखंडे सर, पुणे.



मुलांचे कुतूहल जागे करून ज्ञानाला साकार देणारा हा उपक्रम आहे.
- डॉ. शोभा बनकर, शहापूर.



सदर उपक्रमा अंतर्गत चैतन्यदायी वातावरण निर्मिती करून कंटाळवाण्या अध्ययन अध्यापन पद्धतीचा लोप केल्याचा दिसून आला.
- सिमा खंडगाळे, मुरबाड.



खडू फळ्यावीन अशी असावी शाळा,पुस्तक पाटी नाही, नाही अभ्यासाच्या वेळा, अशी ही डिजीटल शाळा.
- सुधाकर पाटील, वासिंद.



शिकणे शिकविणे नित्याचे काम नसून तो एक सर्वांगसुंदर आनंददायी अनुभव असल्याचे या उपक्रमातून जाणवले.
- सतीश झगडे, मुरबाड.



दुर्गम भागातील चिमण्यांना परिघाबाहेर जाऊन जगाशी ओळख करून देणारा हा उपक्रम आहे.
- जयवंत सांबरे, डोळखांब.



अशा प्रकारच्या शिक्षणातून अध्ययन अनुभव दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल.
- बाळकृष्ण बांगर, शहापूर.



अशा उपक्रमातूनच प्राथमिक शिक्षण दर्जेदार व प्रभावी होईल.
- सुचेता भावाळकर, मुंबई.



खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी सर आपल्या पावलावरच पाऊल ठेऊन चालावं लागेल.
- निकम सर, टोकावडे.



उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान सहज, मनोरंजनात्मक, भितीमुक्त व चिरंतन टिकणारे.
- सुवर्णा कामडे, मुरबाड.



या उपक्रमातून आज आपण काय करायला हवे याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
- शिवाजी तुंगार, नायगाव.



आपल्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन येत्या १५ दिवसात मी माझ्या पगारातून शाळेवर संगणक आणणारच.
- पुनम जाधव, बदलापूर.



आपल्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन येत्या १५ दिवसात मी माझ्या पगारातून शाळेवर संगणक आणणारच.
- पुनम जाधव, बदलापूर.



अशा उपक्रमातून आपल्यासारखे आधुनिक साने गुरूजी निर्माण होतील.
- अनंत केदार, तुळई.



स्वर्ग कुठे आहे मला माहित नाही पण लहान मुलांचा स्वर्ग मी आपल्या शाळेवर पाहिला.
- सचिन भटकर, चिखली.



कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या शाळेत या दृष्टीने प्रयत्न करीन.
- अर्चना मोहिते, मुरबाड.



हा एक मोटिव्हेट करणारा स्तुत्य उपक्रम आहे.
- अरूण शेलवले, माजगाव.



न संपणारी प्रेरणाच असे काम करू शकते.
- डॉ सुरेश मथुरे, मुंबई.



महाराष्ट्रातील सर्व शाळांना अशा उपक्रमाची गरज आहे.
- गणेश पवार, शहापूर.



हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर चालविण्यासाठी शासनाने पावले उचलावीत.
- शांताराम घुले, कल्याण.



शासनाकडून मदत मिळो वा न मिळो, मी हा उपक्रम राबविणारच.
- विष्णू सोगीर, चराचा पाडा.



उपक्रम संपूर्ण राज्याने अनुकरण करण्यासारखा आहे.
- संतोष कछवे, शहापूर.



अमुर्ताला मुर्त स्वरूप दिल्याचे उपक्रमातून दिसून आले.
- राम कुलकर्णी, मुरबाड.



जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.
- संतोष आहिर, शहापूर.



आपल्याकडून मिळणार्‍या मार्गदर्शनाचा, प्रेरणेचा इतरांना फायदा होईल याची शाश्वती वाटते.
- किर्ती कर्डिले, मुरबाड.



या प्रामाणिक प्रयत्नांचा यथोचित गौरव व्हावा.
- जनार्दन वारघडे, टिटवाळा.



.:: मनाचे श्लोक ::.

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।
स्नेहाळू कृपाळू जगीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैंचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५६॥
© २०१३.सर्व हक्क आणि अधिकार जिल्हा परिषद शाळा, पष्टेपाडा यांच्याकडे राखिव. संकेतस्थळ निर्माता प्रथमेश सुरेश शिरसाट